अभिनेत्री केतकी चितळे यांना राज्यातून तडीपार करा, सचिन खरात यांची मागणी
केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला ट्रोलही केलं जात होतं.
आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale Post) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला ट्रोलही केलं जात होतं. “केतकीने अत्यंत खालच्या भाषेत टीका केली असून याची दखल महिला आयोगाने तत्काळ घ्यावी. केतकीला राज्यातून तडीपार करावं,” अशी मागणी रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली.