Kolhapur च्या पंचगंगा नदीपात्रात पुन्हा मृत माशांचा खच
नदीच्या पात्रात माशांचा खच असल्याने तिथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पंचगंगा नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतं असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल अशी कोल्हापूरकरांच्यामध्ये देखील चर्चा आहे.
कोल्हापूर – पंचंगगा (panchganga) नदीत अनेक केमिकल असलेल्या गोष्टी सोडत असल्याने नदीच्या पात्रातील पाणी नेहमी प्रदुषित असल्याचं पाहायला मिळतं. पंरतु तिथं सध्या नदीच्या पात्रात अनेक मासे मेले असल्याचे दिसत आहे. हे मासे कशाने मेले आहेत, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मागच्या आठवड्यात आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी कोल्हापूर (kolhapur) दौ-याच्यावेळी पंचगांगा नदीच्या प्रदुषणाबाबत एक बैठक अधिका-यांची बैठक घेतली होती. त्यांच्या दौ-याला आठदिवस झाल्यानंतर अशी घटना घडल्याने कोल्हापूरात बैठक फक्त नावालाच घेतली असल्याची चर्चा आहे. नदीच्या पात्रात माशांचा खच असल्याने तिथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पंचगंगा नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतं असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल अशी कोल्हापूरकरांच्यामध्ये देखील चर्चा आहे.