Breaking | तब्बल 7 तासांनंतर WhatsApp, फेसबुक सुरू, भारतातील 48 कोटी यूजर्स प्रभावित

| Updated on: Oct 05, 2021 | 8:20 AM

अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला जातो. परंतु, तब्बल सहा तास ही दोन्ही व्यासपीठं ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला होता.

अलीकडच्या काळात जगण्याची ‘मुलभूत’ गरज बनलेल्या सोशल मिडीया व्यासपीठांवरील तांत्रिक बिघाड अखेर तास तासांनी दूर झाला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर होऊन Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला जातो. परंतु, तब्बल सात तास ही दोन्ही व्यासपीठं ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला होता.

इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर सारख्या सोशल मीडिया साईट्स वापरणाऱ्या जवळपास सर्वच युजर्सना आज अडचणी येत आहेत. या सर्व सोशल मीडिया साईट्स डाऊन झाल्याने वापरकर्त्यांसाठी हा ब्लॅकआऊटच आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. सर्व्हर डाऊन होण्याचं प्रमाण हल्ली प्रचंड वाढलं आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. काही टेक्निकल अडचणी असतील, तसेच डिडगची सुद्धा समस्या असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हा एक सायबर हल्ला देखील असू शकतो. जसा-जसा वेळ जाईल किंवा उद्यापर्यंत हा सायबर हल्ला आहे की सर्व्हर डाऊन आहे, याची माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केली.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 October 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 October 2021