राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake?

| Updated on: Apr 19, 2022 | 2:40 PM

राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं म्हटलं जात आहे. राजभवनातून या पत्राबाबतचा खुलासा करण्यात आला असून हे पत्रं बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सूचवली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून ही नावं सूचवली आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना जी नावे सूचवली आहेत. ते सर्वजण सामाजिक क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे वर्षभरानंतर राज्यपालांकडून 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या (maharashtra) इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची वर्णी लावण्यासाठी स्वत:हून सहा नावे सूचवल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं म्हटलं जात आहे. राजभवनातून या पत्राबाबतचा खुलासा करण्यात आला असून हे पत्रं बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Published on: Apr 19, 2022 02:40 PM
अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना !