Balasaheb Thorat LIVE | मविआ सरकार जाणार, हे फडणवीसांचं दिवा स्वप्न : बाळासाहेब थोरात

| Updated on: Aug 19, 2021 | 3:36 PM

भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. जनतेला प्रश्न पडेल, यांना कशाला आशीर्वाद हवा आहे? अनेक नैसर्गिक संकटामध्ये सरकारने जे काम केलं, त्याचे कौतुक सगळीकडे सुरुये. यूपी मध्ये काय झालं? त्यांनी आशीर्वाद मागण्याचा अधिकार देशात नाही राज्यात तर नाही.

भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. जनतेला प्रश्न पडेल, यांना कशाला आशीर्वाद हवा आहे? अनेक नैसर्गिक संकटामध्ये सरकारने जे काम केलं, त्याचे कौतुक सगळीकडे सुरुये. यूपी मध्ये काय झालं? त्यांनी आशीर्वाद मागण्याचा अधिकार देशात नाही राज्यात तर नाही. देवेंद्र जी म्हणाले, आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे ते काम करत आहेत. हे सरकार आज जाईल उद्या जाईल हे दिवा स्वप्न बघत आहेत, आता दोन वर्षे पूर्ण होतील, पुन्हा होणाऱ्या निवडणूक एकत्र लढू आणि हे सरकार परत येईल. सरकार काम करत आहे, सरकारवर टीका करायला सोय‌ नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जातेय, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Rajesh Tope | राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम, मात्र केंद्राकडून लसीच उपलब्ध नाही : राजेश टोपे
PM Modi Mandir | औंधमधील मोदींचं मंदिर हटवलं, राष्ट्रवादीचं उपरोधिक आंदोलन