हातांची झोळी केली…सोपे नव्हते मला हरविणे म्हणून त्यांनी टोळी…, तुपकरांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 26, 2024 | 12:32 PM

आधी मुद्रा भोळी केली मग हातांची झोळी केली. सोपे नव्हते मला हरविणे, म्हणून त्यांनी टोळी केली, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी विरोधक, प्रतिस्पर्धी यांना जोरदार टोला लगावला. जनता ज्याच्या बाजूने आहे, त्याचा विजय निश्चित.... रविकांत तुपकरांनी काय व्यक्त केला विश्वास?

बुलढाण्यातील जनतेने नेहमी पाठिंबा दिलाय त्यांचे उपकार विसरणं अशक्य आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या निवडणुकीत जे प्रेम जनतेने दिलंय ते म्हणजे माझ्या चामड्याचे जोडे करून जरी त्यांना घातले तरी त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. तर नेते विरूद्ध जनता असा सामना बुलढाण्यात पाहायला मिळतोय. त्यामुळे आधी मुद्रा भोळी केली मग हातांची झोळी केली. सोपे नव्हते मला हरविणे, म्हणून त्यांनी टोळी केली, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी विरोधक, प्रतिस्पर्धी यांना जोरदार टोला लगावला. जनता ज्याच्या बाजूने आहे, त्याचा विजय निश्चित असल्याचे म्हणत रविकांत तुपकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर लोकांचा मोठा प्रतिसाद प्रचारसभांना मिळाला. प्रस्थापित नेत्यांचा प्रचंड दबाव असताना सर्वसामान्य जनता सोबत असल्याने विजय जनतेचाच होणार आहे, असे तुपकरांनी म्हटले.

Published on: Apr 26, 2024 12:32 PM