तर बाकीच्यांना पेन्शनची गरज काय?, शेतकरी नेत्यांनं केली प्रश्नांची सरबत्ती, बघा काय म्हणाले
VIDEO | 'पेन्शन द्यायची असेल तर सरसकट सर्वांना द्या. नाहीतर...', शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक होत केले सवाल?
बुलढाणा : जुन्या पेन्शनच्या मागणी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस असून अद्याप सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. लोकप्रतिनिधी पाच वर्षांसाठी निवडून येतात. त्यांनाही पेन्शन मिळते. ते दोन-तीन वेळा निवडून आल्यास त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होते. लोकप्रतिनिधी कायदे तयार करतात. ते स्वतःच्या हिताचे. मग कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं, असा थेट सवाल शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या नेत्यानं उपस्थित केला आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्याने सरकारवर बोजा पडेल. परंतु हा नैतिकतेचा ही प्रश्न आहे. पेन्शन द्यायची असेल तर मग सरसकट सर्वांना द्या. नाहीतर कुणालाही देऊ नका. राजकारणातील दोन पाच टक्के प्रामाणिक लोकप्रतिनिधी सोडले तर बाकीचे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपये जमा करतात. त्यांना पेन्शनची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. बघा काय काय मुद्दे केले उपस्थित…