गारपीट, अवकाळीनंतर प्रशासन कामाला, ‘या’ भागात पंचनामे युद्धपातळीवर सुरू
VIDEO | मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक थेट गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेल्या शेत बांधावर
नाशिक : गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सलग सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने बळीराजा उद्ध्वस्त झालाय. नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आल्यानंतर आज दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागात युद्धपातळीवर पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. नाशिकच्या सटाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट मदत जाहीर केली जाणार आहे.
Published on: Apr 17, 2023 02:30 PM