बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, १४ तासांनंतर ‘या’ गावात गारांचा खच, बघा व्हिडीओ
VIDEO | राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट, बीड जिल्ह्यात या गावातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, शेतीचं झालं मोठं नुकसान
बीड : सलग दुसऱ्या आठवड्यात पुन्हा गारपीट झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील अरणविहरा, हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगाव घाट सह तब्बल 12 गावात गारपीट झाली. गारपीट एवढी मोठी होती की अक्षरशः हिमालयाचे स्वरूप शेतात पहायला मिळाले. तर सर्वात जास्त फटका अरणविहरा गावाला बसला असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्या आहे तर या घरात अजूनही गारांचा खच बघायला मिळतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडात आलेला घास हिरावून नेला आहे. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्याचं उभं पिक आडवं झालं असून राज्यातील काही भागातील शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
Published on: Apr 17, 2023 07:32 AM