रविकांत तुपकर यांनी दिला आत्मदहनाचा इशारा, काय आहे कारण?
अंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रविकांत तुपकर भूमिगत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उद्या करणार आत्मदहन आंदोलन
बुलढाणा : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत, तसेच पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तर मागील तीन महिन्यापासून तुपकर हे आंदोलन करत आहेत. मात्र सरकार काही याकडे लक्ष देत नसल्याने उद्या होणाऱ्या ११ तारखेच्या आंदोलनात तुपकरांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतली आहे. या आंदोलनावर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मात्र तुपकर हे काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भूमिगत झाले असून मुंबई व बुलढाणा पोलिसांचे टेंशन वाढले असल्याचे सांगितले जात आहे.