कांदा निर्यात बंदीला विरोध कायम, कांद्याचे भाव निम्म्यानं घसरले; शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्तेत जात असल्याचं अजित पवार गटाची विधान व्हायरल होऊ लागलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरण्यापेक्षा सत्तेत जाऊन थेट राज्यात आणि केंद्रात जाऊन प्रश्न सोडवू असं आश्वासन अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी दिलं होतं.
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : कांद्याच्या निर्यात बंदीविरोधात शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. कांद्याचे भाव निम्म्याने खाली आलेत. तर दुसरीकडे सरकारने केलेल्या वायद्यानुसार शेतकरी प्रश्न विचारताय. अशातच अजित पवार गटाने कांद्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. तो मुद्दाही चर्चेत आलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्तेत जात असल्याचं अजित पवार गटाची विधान व्हायरल होऊ लागलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरण्यापेक्षा सत्तेत जाऊन थेट राज्यात आणि केंद्रात जाऊन प्रश्न सोडवू असं आश्वासन अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी दिलं होतं. मात्र आता कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना कांदा निर्यात बंदी हा राज्याचा विषय असता तर झटपट निर्णय घेतला असता असं भुजबळ यांनी म्हटलंय. ८ डिसेंबर रोजी कांद्यासाठी दिल्लीतून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं, ११ डिसेंबर रोजी अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्यांनीच दिली तर राजस्थान एमपीच्या शपथविधीमुळे दिल्ली दौरा लांबला असावा, असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय.