मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, कुणाचा गंभीर आरोप?

| Updated on: May 31, 2024 | 4:15 PM

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे म्हणत रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री तुम्ही काय करता आहात? तुपकर यांचा सवाल

बुलढाणा जिल्ह्यात मागील पाच महिन्यात तब्बल 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या नोंदी झालेल्या आत्महत्या आहेत. पण ज्यांच्या नोदींच नाही त्यांचं काय? सरकारला कधी जाग येणार? असा आक्रमक सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट सरकारला करत हल्लाबोल केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणाले होते, मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे म्हणत रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री तुम्ही काय करता आहात? खरिप हंगाम असताना शेतकऱ्यांना खत, बियाण्याचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सत्तेच्या मस्तीत हे सरकारं मश्गूल आहे. शेतकऱ्यांचा संयम तुटला तर शेतकरी रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.

Published on: May 31, 2024 04:15 PM
तर निवडणूक लढवणार, मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा
मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, तिकीट दिलं तर भाजपकडून, नाही तर अपक्ष, कुणी घेतले दोन अर्ज?