बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट; पीक डोळ्यादेखत वाया अन् बळीराजा हवालदिल
बीड जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडविला आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, बाजरी, यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक डोळ्यादेखत वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी आणि गेवराई परिसरात झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडविला आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, बाजरी, यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक डोळ्यादेखत वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वच पिके अक्षरशः आडवी झाले आहेत. शासनाने मदत करावी अशी एकच आस आता शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटने ९५ हेक्टरवर पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यात १८ गावांत पिकांचे नुकसान झाले आहे. मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. रब्बी हंगामात अखेरच्या टप्प्यात लागवड केल्यानंतर काढणीस आलेली पिके, फळपिके, भाजीपाला वर्गीय उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. डांगर, टरबूजाला तडे गेले तर इतरही पिकांचं नुकसान झाल्याने बळीराज्याच्या डोळ्यात पाणी आहे.