VIDEO : Fast News | 1.30 PM | महत्वाच्या बातम्या | 29 March 2022
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे. आताच्या काळात अफवा किती पसरविल्या जात आहेत हे तुम्हीही पाहत आहात.
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे. आताच्या काळात अफवा किती पसरविल्या जात आहेत हे तुम्हीही पाहत आहात. इतरांकडून फिडिंग येतं आणि त्या अफवांच्या बातम्या होतात. त्या खोलात मी जाणार नाही. ज्या अधिकृत गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच. पण अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.