VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 3 April 2022
आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. हे बघावं लागेल. अडीच वर्षानंतर राज ठाकरे बोलताहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत आज बोलत होते. संजय राऊत म्हणाले, भाजप-शिवसेनेत काय झालं. हे आम्ही बघू. यात तिसऱ्याची आवश्यकता नाही.
आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. हे बघावं लागेल. अडीच वर्षानंतर राज ठाकरे बोलताहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत आज बोलत होते. संजय राऊत म्हणाले, भाजप-शिवसेनेत काय झालं. हे आम्ही बघू. यात तिसऱ्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं बघा. शिवाजी पार्कवर काल भारतीय जनता पक्षाचाच लाऊडस्पीकर वाजत होता. भाजपचंच हे स्क्रीप्ट होतं, असं वाटतं. टाळ्याही भाजपच्याच होत्या. त्यावर जास्त न बोललेलंच राज्याच्या हिताचं राहील. मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री ठाकरे आपलं काम करत आहेत.