VIDEO : Fast News | फास्ट न्यूज | 11.30 AM | 25 October 2021
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे. समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे.