VIDEO : Fast News | 11.30 AM | महत्वाच्या बातम्या | 25 May 2022
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी संभाजी छत्रपतींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पण भाजपची भूमिका स्पष्ट केली नाही.
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी संभाजी छत्रपतींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पण भाजपची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजी राजे यांच्या उमेदवारी बाबात ज्या प्रकारे शरद पवारांनी हा विषय सुरु केला. आणि त्यानंतर हा विषय वेगळ्या दिशेनं गेला. कदाचित संभाजी राजे यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असावा. पण हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर मी बेलण्याचं कारण नाही, अशी सावध प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.
Published on: May 25, 2022 12:36 PM