Fast News | 4 PM | महत्वाच्या बातम्या | 12 October 2021

| Updated on: Oct 12, 2021 | 5:01 PM

अजित पवारांनी सुद्धा आमच्या विभागाला सूचना केल्या होत्या की कॉलेज सुरू झालं पाहिजे, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अधिकृत पत्र आमच्या विभागाने दिलेला नाही असं सष्टीकरण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलय. 

पुण्यातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भावरून संभ्रम पहायला मिळतोय.पुण्यातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूतोवाच केलं होतं.अजित पवारांनी सुद्धा आमच्या विभागाला सूचना केल्या होत्या की कॉलेज सुरू झालं पाहिजे, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अधिकृत पत्र आमच्या विभागाने दिलेला नाही असं सष्टीकरण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलय. काही स्वायत्त संस्थांकडून महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय अशा महाविद्यालयांना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विनंती केलीय. शासनाचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल, येत्या दोन दिवसात यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. सुरुवातीला मी कॉलेज सुरू केलं हे सांगण्यासाठी जर काय महाविद्याल  सुरू केली तर ते चुकीचं आहे असं सष्ट मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडलय.

Pankaja Munde | ‘…तर ओबीसी समाज तुम्हाला रस्त्यावर उतरु देणार नाही’ – मुंडेंचा माविआ सरकारला ईशारा
Aurangabad | औरंगाबादच्या जडगावामध्ये कार तलावात कोसळून चौघे ठार