Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 27 July 2021
राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.