Fast News | 4 PM | महत्वाच्या बातम्या | 8 October 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि व्यक्तींवर आयकर विभागानं छापेमारी केलीय. अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि व्यक्तींवर आयकर विभागानं छापेमारी केलीय. अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय.
जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. दे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. न्यायालयात माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असंही शालिनी पाटील यांनी म्हटलंय.