Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5 PM

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5 PM

| Updated on: Nov 23, 2021 | 7:37 PM

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. हे सरकार एसटी कामगारांशी संभाषण करत नाही. या सरकारला अहंकार आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. हे सरकार एसटी कामगारांशी संभाषण करत नाही. या सरकारला अहंकार आहे. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली. या कामगारांच्या मदतीला कोणीही गेलं नाही. आमदार आणि खासदारांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आमचे कार्यकर्ते गेले तेव्हा नेत्यांनी बोलायची तयारी केली, असं त्या म्हणाल्या.

आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सह्याद्रीवर अनिल परब आणि ST कर्मचाऱ्यांची बैठक, पडळकरही राहणार उपस्थित
कंगना रनौतविरोधात शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल