VIDEO: Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 27 July 2021
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज जन्मदिन. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज जन्मदिन. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे, तसेच सर्वांनासोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री असल्याचे देखील अजित पवार म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.