VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 14 February 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलनाचा सपाटा सुरू केला आहे. आज काँग्रेसने (Congress) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सागर निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पटोले यांना अडवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलनाचा सपाटा सुरू केला आहे. आज काँग्रेसने (Congress) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सागर निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पटोले यांना अडवलं आहे. तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. आझाद मैदानात जा, असं पोलिसांनी पटोले यांना सांगितलं. तर, आम्हाला फक्त मेसेज द्यायचा आहे. आम्ही आहे तिथून आंदोलन करू. आझाद मैदानात जाणार नाही, असं नाना पटोले यांनी पोलिसांना निक्षून सांगितलं आहे.