VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 18 June 2021
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (The Serum Institute of India (SII) आता लहान मुलांसाठी कोव्हिड लसीची चाचणी घेणार आहे. नोव्हाव्हॅक्सच्या (Novavax) कोव्होवॅक्स (Covovax) या कोरोना लसीच्या क्लिनीकल चाचणीसाठी सीरमला परवानगी मिळाली आहे.
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (The Serum Institute of India (SII) आता लहान मुलांसाठी कोव्हिड लसीची चाचणी घेणार आहे. नोव्हाव्हॅक्सच्या (Novavax) कोव्होवॅक्स (Covovax) या कोरोना लसीच्या क्लिनीकल चाचणीसाठी सीरमला परवानगी मिळाली आहे. देशात लहान मुलांवर केली जाणारी ही चौथी चाचणी ठरणार आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे. सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे.