VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 18 November 2021
मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ट्विटरवर त्यांनी अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ट्विटरवर त्यांनी अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी टाकली आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगल प्रकरणी भाजप नेत्यांनी पैसा पुरवून हिंसक कारवाया घडवून आणल्या, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तर महाविकास आघाडीनेच या दंगलींना पैसा पुरवल्याचा आरोप अनिल बोंडे आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे ट्विट केलंय.