VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 19 October 2021
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी आता थेट शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी आता थेट शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे. किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे 3 हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक काही निघत नाही.