Fast News | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी
1) औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
2) संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. 2185 मराठा तरुणांच्या नियुक्तीसाठी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
3) इचलकरंजी शरहामध्ये शिवसेनेने नगरपालिका सभेत जोरदार गोंधळ घातला. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं गेलं.
4) यंदा पायी वारी होणारच, असे वक्तव्य भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची फक्त 50 वारकऱ्यांच्या अपस्थितीतील वारी करण्याची मागणी मान्य न केल्यामुळे भोसले यांनी वरील वक्तव्य केले आहे.