VIDEO : Fast News | RAIN | 12.30 PM | महत्वाच्या बातम्या | 29 September 2021
गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण केली. गुलाबी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. लाखो हेक्टरवरील काढणीला आलेली पीकं पाण्याखाली गेलीत. शेतीला अक्षरश: तळ्याचं स्वरुप आलंय. शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. कधी नव्हे तो पाऊस बरसला, इतका बरसला की होत्याचं नव्हतं झालं, अशा भावना आज मराठवाड्यातील अनेक शेतकरी बोलून दाखवत आहे. गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण केली. गुलाबी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला.