Pune-Mumbai Expressway FASTag : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आज मध्यरात्रीपासून…

Pune-Mumbai Expressway FASTag : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आज मध्यरात्रीपासून…

| Updated on: Apr 01, 2025 | 4:08 PM

पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा...

पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा… पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला टोलसाठी दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC यांच्याकडून एक सूचना लावण्यात आली आहे. त्यामध्ये आजरात्री मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य असून पथकर, टोल केवळ ई-टॅग किंवा फास्टॅगद्वारेच स्विकारला जाणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. टोल नाक्यावर किंवा एक्स्प्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २०१९ पासून फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली होती. तर १ डिसेंबर २०१९ पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं असून राज्यात १ एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. यासह आज मध्यरात्रीपासून एमएसआरडीसीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझावर फास्टॅगद्वारे पैसे भरणे बंधनकारक असणार आहे. जर नसेल तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. तुमच्या वाहनाला आहे ना फास्टॅग?

Published on: Apr 01, 2025 04:08 PM
Chitra Wagh : ‘स्वयंघोषित विश्व गुरू, उबाठाचा पोपट अन् रडत राऊत…’, चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
‘एप्रिल फूल’ डेला आपल्याकडे ‘अच्छे दिन’ म्हणतात; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका