Special Report | बापाकडून पोटच्या गोळ्याची विक्री, नांदेडमधल्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ
नांदेडच्या कुटुंबाने मुलीची तीन वेळा विक्री केल्याचं समोर आलं आहे. आधी मुलीला राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबादमधून दोन वेळा विक्री झाली होती.
नांदेडमध्ये बापाने पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. हदगाव तालुक्यातील ही घटना असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून मुलीची विक्री केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या कुटुंबाने मुलीची तीन वेळा विक्री केल्याचं समोर आलं आहे. आधी मुलीला राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबादमधून दोन वेळा विक्री झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आता मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून मुलीची विक्री केल्याचा आरोप आहे.