Imtiyaz Jaleel | भाजपच्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, इम्तियाज जलील यांची मागणी
जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी (Jan Ashirvad Yatra) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी केली आहे. जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी (Jan Ashirvad Yatra) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसंच एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला विचारला.
(File charges against Raosaheb Danve And Bhagwat karad demand MIM MP Imtiaz Jalil)