संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कुणाचं पत्र?
VIDEO | शिवसेनेच्या या आमदारानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थेट पत्र लिहित केली मागणी
मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून तसेच माध्यमांतून शिंदे सरकार कसं बेकायदेशीर आहे. त्याचा आदेश मानू नका असे वक्तव्य केलेत. परंतु, दुसऱ्या दिवशीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्व पक्ष फिरून आले आहेत आणि ते शिवसेनेतच वकीली करत होते. त्यांनी शिवसेनेच्या १६ अपात्रतेच्या मुद्द्यावर चुकीचा निर्णय दिला तर त्यांनी रस्त्यावर फिरू देणार नाही, असे वक्तव्य करणं म्हणजे हक्कभंग केल्यासारखे असल्याचे मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. विधानसभा हे कायदे तयार करणारं मंडळ आहे आणि विधानसभा अध्यक्षांना तसा अधिकारही असतो. म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रतिक्रिया, कमेंट करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्यात यायला हवा, यासंदर्भात संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे.