‘आत्महत्येस प्रवृत्त केलं’, नितीन देसाई यांच्या पत्नीची पोलिसांत तक्रार; ‘या’ 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल
VIDEO | नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलिसांची मोठी कारवाई; पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल...नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसांकडे नोंदवला जबाब
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | ज्येष्ठ कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र नितीन देसाई यांनी ही आत्महत्या का केली? याचा तपास सुरू असताना या प्रकरणाला वेगळं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी एडलवाईज कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरु झाला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या आरोपींची नावं समोर आली आहेत. पत्नीने रायगड पोलिसांत दिलेल्या जबाबावरून एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. यामध्ये एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांचा समावेश आहे. तसेच स्मित शाह, आर के बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. तर पत्नी नेहा यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, पतीने मानसिक त्रासामुळे स्वतःला संपवलं. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस कंपनीचे अधिकारी कर्जाबाबत पतीला वारंवार मानसिक त्रास देत होते. असं देखील नितीन देसाई यांच्या पत्नी यांनी म्हटले आहे.