Mumbai Fire | खार परिसरातील नूतन व्हिला इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू
खार पश्चिममध्ये नूतन व्हिला या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिलांची प्रकृती स्थिर आहे. दोन्ही महिलांवर उपचार सुरु असून मृत महिलेला सुरुवातीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : खार पश्चिममध्ये नूतन व्हिला या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिलांची प्रकृती स्थिर आहे. दोन्ही महिलांवर उपचार सुरु असून मृत महिलेला सुरुवातीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे तीचा मृत्यू झाला. मृत महिला चाळीस वर्षांची असून तिचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली आहे.