BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 21, 2024 | 5:19 PM

मुंबईतील नरीमन पॉइंट येथे असणाऱ्या भाजपच्या कार्यालयाला आग लागली आहे. ही आग काही क्षणातच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेरील परिसरात एकच धूर आणि आगीचे लोट पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील नरीमन पॉइंट येथे असणाऱ्या भाजपच्या कार्यालयाला आग लागली आहे. ही आग काही क्षणातच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेरील परिसरात एकच धूर आणि आगीचे लोट पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. आज साधारण साडे चार वाजेच्या सुमारास ही आग लागली. भाजपच्या या कार्यालयाचे नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि कार्यालयात आद भडकली. ऑफिसमध्ये असणारे कागदपत्रे आणि लाकडी फर्निचरने या आगीमुळे अधिकच पेट घेतला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. कार्यालयात कोणीही अडकलेलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Apr 21, 2024 05:19 PM
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
दिसायला भोळ्या पण कपटी, बड्या नेत्याची रश्मी ठाकरेंवर टीका, …म्हणून ठाकरेंना अडीच वर्ष घरात कोंडलं