आधी उद्धव ठाकरेंसोबत युती आता प्रकाश आंबेडकर म्हणताय, एकनाथ शिंदेंची शिवसेनाच….
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना मानतो असा दावा केला आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या स्ट्राईक रेटचा दाखला दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाच स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्ट्राईक रेट बघितल्यानंतर शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी असल्याचे मानतात, असं नवं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना मानतो असा दावा केला आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या स्ट्राईक रेटचा दाखला दिला. थोडक्यात एकनाथ शिंदे यांनी १५ जागा लढवल्या त्यात ७ जिंकल्या त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ४६.३० असा आहे. तर उद्धव ठाकरे यांनी २१ जागा लढवल्या त्यात ९ जिंकल्या त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ४२. ८५ असा राहिला. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाच स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. बघा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?