आधी जळजळीत टीका आणि आता म्हणाल्या ‘मोठ्या ताई’; भाजपच्या चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळे यांच्यात घडतंय तरी काय?
चित्रा वाघ यांनी कालच सुप्रिया सुळे यांच्यावर जळजळीत टीका केली होती. पण, चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना मोठ्या ताई म्हणत एक सल्ला दिलाय. मोठ्या ताई भाजपवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षावर लक्ष द्या. चिंतन करा असे त्या म्हणाल्यात.
मुंबई : 12 ऑक्टोबर 2023 | भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर x x ताई अशी काल टीका केली होती. मात्र, चित्रा वाघ यांनी अवघ्या काहीं तासानंतर त्यांना मोठ्या ताई म्हटलंय. राज्याच्या मोठ्या ताई चांगल्या आहेत. पण, योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालं आहे का? असे चित्रा वाघ म्हणाल्यात. राज्यातल्या आमच्या भगिनी एकरी शंभर कोटी वांगी पिकवू शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात जन्म घेणारी मुलगी ही लखपती होणार असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा टोला वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लगावलाय. कोणी लखपती होत असेल तर तुमच्या करोडपती होण्यावर कोणी आघात करत नाही. महिलांना मानसन्मान द्यायचा तर इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये महिलांना जास्त मानसन्मान मिळतो.
Published on: Oct 12, 2023 04:08 PM