India Alliance मध्ये फूट पडणार? ‘या’ तीन बड्या पक्षांमुळे इंडिया आघाडीत होणार बिघाडी?

| Updated on: Dec 20, 2023 | 4:15 PM

चार राज्यातील पराभवानंतर इंडिया आघाडीची पहिलीच बैठक असल्याने लोकसभेच्या तयारीचा आढावा आणि चर्चा या बैठकीत झाली. मात्र या बैठकीला २४ तास उलटत नाहीतर आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, २० डिसेंबर २०२३ : नवीदिल्ली येथे इंडिया आघाडीची काल बैठक झाली. चार राज्यातील पराभवानंतर इंडिया आघाडीची पहिलीच बैठक असल्याने लोकसभेच्या तयारीचा आढावा आणि चर्चा या बैठकीत झाली. मात्र या बैठकीला २४ तास उलटत नाहीतर आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होणार असल्याची चिन्ह आहे. जागावाटपावरून तृणमूल आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच वाद झाल्याची माहिती समोर येतेय. इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर काल ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यात विशेष बैठक झाल्याची माहिती मिळतेय. पंजाबमध्ये जागावाटपावरून काँग्रेस आणि आपमध्ये वादाची ठिणगी पडली. तर सिताराम येचुरींच्या वक्तव्याने तृणमूल आणि माकपमध्ये जुंपल्याचे माहिती मिळतेय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा पराभव करायचा असे येचुरींनी वक्तव्य केले होतं.त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Published on: Dec 20, 2023 04:14 PM
सरकार शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला तयार नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल काय?
शिवसेना अपात्रता प्रकरणावरील निकाल ऐतिहासिक असणार? अनिल देसाई सुनावणीवर म्हणाले….