Sharad Pawar यांच्या दिल्लीतल्या घरी INDIA च्या ‘या’ 13 समन्वयकांची बैठक होणार

| Updated on: Sep 05, 2023 | 8:02 AM

VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी १३ सप्टेंबर रोजी होणार इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात इंडिया  आघाडीच्या समन्वयकांची बैठक, कोण-कोण राहणार हजर?

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | नुकत्याच झालेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात इंडिया आघाडी देशातील आगामी लोकसभा निवडणूक शक्य तितक्या एकत्रितरित्या लढणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता INDIA आघाडीच्या १३ समन्वयकांची पहिली बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी होणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ठाकरे गट संजय राऊत, डीएमकेचे एम के स्टॅलिन, काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, आरजेडीचे तेजस्वी यादव, तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्डा, समाजवादी पार्टीचे जावेद अली खान, जेडीयूचे लल्लन सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, सीपीआयचे डीराजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुला, पीडीपीचे मेहबुबा मुफ्ती या INDIA च्या सर्व नेत्यांचा उपस्थितीत शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी पहिली बैठक होणार आहे.

Published on: Sep 05, 2023 08:02 AM
Bachchu Kadu यांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, ‘अन्यथा अंत व्हायला वेळ लागणार नाही’
मनोज जरांगे पाटील यांनी दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला, Saamana Editorial मधून सरकारवर हल्लाबोल