दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

| Updated on: Jul 24, 2022 | 3:09 PM

दिल्लीत मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलाय. दिल्लीत रुग्णाने देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नाही. आतापर्यंत देशात चार रुग्ण आढळलेत.

मुंबई: दिल्लीत मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलाय. दिल्लीतील रुग्णाने देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नाही. आतापर्यंत देशात चार रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. केरळमध्ये हे तीन रुग्ण आढळले आहेत. मंकी पॉक्सची लागण झालेल्या या रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णाचं अंदाजे वय 31 वर्ष इतकं आहे. या रुग्णाला ताप आणि त्वचेवर आलेल्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता मंकीपॉक्सची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं आहे.

Published on: Jul 24, 2022 03:09 PM
‘मुंबईला श्वास घेऊन द्या’, आरे वाचवण्यासाठी आपचं आंदोलन
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर दाखल