Omicron Breaking | कर्नाटकातील ऑमिक्रॉनबाधित रुग्णाचं दुबाईला पलायन
कोरोनाच्या काळात बोगसगिरी केल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिलीत, वाचलित पण आता ओमिक्रॉननं भीती निर्माण केलेली असतानाही ही बोगसगिरी थांबलेली दिसत नाही
मुंबई : कोरोनाच्या काळात बोगसगिरी केल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिलीत, वाचलित पण आता ओमिक्रॉननं भीती निर्माण केलेली असतानाही ही बोगसगिरी थांबलेली दिसत नाही. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचा जो पहिला पेशंट सापडला त्यानं देशातून पळ काढल्याचं उघड झालंय. कर्नाटकच्या (Karnataka Omicron Cases) प्रशासनानं त्याला दुजोरी दिलाय. विशेष म्हणजे ओमिक्रॉनच्या ह्या पेशंटनं कोरोनाचा नेगेटीव्ह रिपोर्ट दाखवून पळ काढल्याचं स्पष्ट झालंय. पण त्याची कुठलीही टेस्ट झालेली नसताना सुद्धा त्याला कुठून कोरोनाचा रिपोर्ट (Omicron Report) मिळाला याचा आता शोध घेतला जातोय.