दहा वर्षांनी विरोधी बाकांवर 100 हून जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला

| Updated on: Jun 25, 2024 | 11:16 AM

खासदारांची संख्या वाढल्यामुळे विश्वास वाढलाय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांची झलकही पाहायला मिळाली. गेली दहा वर्ष देशाच्या संसदेला विरोधी पक्ष नेता नव्हता, मात्र यंदा तो लाभणार असल्याने विरोधी बाकांवरची संख्याही वाढली आहे. यंदाची निवडणूक ज्या संविधानाच्या मुद्द्यावर गाजली त्याचीच प्रचिती संसदेतही दिसली.

Follow us on

दहा वर्षांनंतर विरोधी बाकांवरील खासदारांची संख्या ही शंभरहून जास्त आहे. खासदारांची संख्या वाढल्यामुळे विश्वास वाढलाय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांची झलकही पाहायला मिळाली. नव्या इंडिया सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू झालंय. गेली दहा वर्ष देशाच्या संसदेला विरोधी पक्ष नेता नव्हता, मात्र यंदा तो लाभणार असल्याने विरोधी बाकांवरची संख्याही वाढली आहे. यंदाची निवडणूक ज्या संविधानाच्या मुद्द्यावर गाजली त्याचीच प्रचिती संसदेतही दिसली. मोदी जेव्हा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घ्यायला उभे राहिले तेव्हा विरोधी बाकांवरून राहुल गांधींसह अखिलेश यादव यांनी संविधानाच्या प्रती दाखवून घोषणाबाजी केली. तर विशेष म्हणजे ज्यावेळी नितीन गडकरी शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा विरोधकांनी बाकं वाजवून त्यांचं जोरदार स्वागत केलं…. बघा स्पेशल रिपोर्ट