लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर, पहिल्या टप्प्यातील मतदान ‘या’ दिवशी होणार

| Updated on: Mar 16, 2024 | 4:49 PM

अखेर देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४ : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. अखेर देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. यावेळी निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Mar 16, 2024 04:42 PM
मी तात्या पेक्षा मोठा… वसंत मोरेंना मोठा भाऊ म्हणून धंगेकरांचा मोलाचा सल्ला काय?
Lok Sabha Election 2024 : डबल मतदान कराल तर गोत्यात याल… निवडणूक आयोगानं काय दिला इशारा?