Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेसाठी काहीच तास शिल्लक, गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची बघा पहिली झलक

| Updated on: Jan 19, 2024 | 1:33 PM

संपूर्ण देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात राममय भगवं वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे.

अयोध्या, १९ जानेवारी २०२४ : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि राम मंदिराच्या लोकार्पणासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. संपूर्ण देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात राममय भगवं वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही पहिली झलक समोर येताच सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा हा पहिला वहिला फोटो चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्तीही बालरूपातील असून त्या मूर्तीचे डोळे झाकूण ठेवण्यात आले आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी ही सुबक मू्ती साकारली असून २२ तारखेच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीपर्यंत या मूर्तीचे डोळे बंदच असणार आहेत. दरम्यान, कृष्णशिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे काम करत होते. त्यातील योगीराज यांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय झाला.

Published on: Jan 19, 2024 01:33 PM
ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा; भाजपच्या जुन्या आरोपांवरून विरोधकांचा घेरा
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या दिमतीला व्हॅनिटी व्हॅन, व्हॅनिटीतूनच मुंबईला येणार; काय आहेत सुविधा?