भाजपच्या अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या काळात मालेगावची विधानसभा ही आम्ही शिवसेनाला जिंकून दाखवू. जो विश्वास उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे, त्या पद्धतीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र फिरून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि पहिल्या […]
भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या काळात मालेगावची विधानसभा ही आम्ही शिवसेनाला जिंकून दाखवू. जो विश्वास उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे, त्या पद्धतीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र फिरून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि पहिल्या क्रमांकाचा शिवसेना पक्ष कसा येईल, यासाठी प्रयत्नशील असेल, अशी भावना अद्वय हिरे यांनी व्यक्त केली.
यावेळी अद्वय हिरे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, ५० गद्दार भाजपच्या जवळ आल्यापासून भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही. मालेगावात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन होत असताना भाजप च्या सरकारने कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भाजप सोडण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी आम्ही पुढची लढाई लढू असेही त्यांनी म्हटले आहे.