उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आमचा बाप…’

| Updated on: Apr 02, 2023 | 11:32 PM

VIDEO | संभाजीनगरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत भाजप आणि सध्याच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाप चोरी केला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जाहीर टीकेनंतर शिंदे यांची शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बापाबद्दल जे बोलल्या ते विसरले. माझं ते वक्तव्य टोचत असेल तर तिचा सन्मान करा. शिवसेना प्रमुख फक्त तुमचे वडील नव्हते ते देशाचे होते. आमचा दिनक्रम आजही सहेबांच्या नावाने होतो. आम्ही काही चोरलं नाही. तुम्हाला लोकं जोडे मारतील. तुम्ही बाळासाहेबांच्या नावाचा व्यापार कराल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला डुबवणार. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही घरात बसले आणि त्यावेळी आम्हालाही घरात बसवलं. आम्हाला नामशेष करण्याची भाषा बोलताय तर तुम्हाला शुभेच्छा, असे म्हणत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे.

Published on: Apr 02, 2023 11:31 PM
महिलेला शिवीगाळ अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले…
वज्रमूठ बांधलीय खरी, पण तीच वज्रमूठ एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये म्हणजे झालं!; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र