Pune | पहिला श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराचे गाभारे सजले, दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी बंदच

| Updated on: Aug 09, 2021 | 10:28 AM

आज पहिला श्रावणी सोमवार आहे. आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यानिमित्त राज्यातील शिव मंदिराचे गाभारे सजले आहेत. मात्र मंदिराजे दरवाजे आज फक्त पूजेसाठी खुले राहणार आहेत. मात्र, अनेक मंदिरांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे.

आज पहिला श्रावणी सोमवार आहे. आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यानिमित्त राज्यातील शिव मंदिराचे गाभारे सजले आहेत. मात्र मंदिराजे दरवाजे आज फक्त पूजेसाठी खुले राहणार आहेत. मात्र, अनेक मंदिरांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. तर पुण्यातील भीमाशंकर येथे सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल मंजुळा हुन्नुर यांनी केलीय. सजावटीनंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं सावळे सगुण रुप पाहायसा मिळत आहे.

Saamana | खेलरत्नचं नामकरण म्हणजे राजकीय खेळ, ‘सामना’तून केंद्र सरकारवर निशाणा
Rajesh Tope | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ च्या रुग्ण संख्येत वाढ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती