महाविकास आघाडीत फूट, पण आव्हान कायम? अजित पवार यांच्या बंडानंतर काय सांगतो पहिला सर्व्हे?

| Updated on: Jul 31, 2023 | 7:36 AM

VIDEO | लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कशी असेल परिस्थिती? अजित पवार यांच्या बंडानंतर काय सांगतो पहिला सर्व्हे? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, 31 जुलै 2023 | अजित पवार यांच्या बंडानंतर पहीलं सर्व्हेक्षण समोर आलं. या घडीला लोकसभा निवडणुका लागल्या, तर काय चित्र असेल. यासंदर्भात इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स या संस्थेने सर्व्हेक्षण केलंय. कोणाला किती जागा, कोणत्या भागात कोण वर्चड ठरणार. कुणाला किती टक्के मतदान असे अंदाज बांधण्यात आलेत. अजित पवार गट सत्तेत जाऊनही लोकसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्व्हेक्षणात आता निवडणुका झाल्यास आकडे उलटण्याचा अंदाज आहे. भाजपबरोबरच शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असा सर्व्हेचा अंदाज आहे. २०२२ मध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेत फूट पडली. शिंदे गट वेगळा झाला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार यांनी दुसरा गट स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला. तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड ठरण्याचा अंदाज सर्व्हेक्षणानं व्यक्त केलाय.

Published on: Jul 31, 2023 07:36 AM
‘…त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ; प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचाही टीका
सत्तासंघर्षाचा तिढा कायम, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील ठाकरे गटाची सुनावणी लांबणीवर?