खवय्यांनो, तोंडाला आवरा… आता मासे महागणार; कारण तर जाणून घ्या

| Updated on: Feb 08, 2023 | 12:10 PM

मासेमारीला लागला ब्रेक, मासे महागणार; काय आहे कारण जाणून घ्या?

रत्नागिरी : सध्या समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला मोठा ब्रेक लागला आहे. कोकण किनारपट्टीवर मतलई वाऱ्यांचा वेग वाढल्याने सध्या मच्छिमारी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड किनाऱ्यावरील अनेक बंदरात मच्छिमारी नौका बंदरात उभ्या आहेत. पण सध्या मच्छिमारी बंद असल्याने माशांची आवक घटल्याने माशांचे दर चांगलेच वाढले आहे. पापलेट १ हजार रूपये, सुरमईचे दर ७००-८०० रूपये, कोळंबी आता ६०० रूपये किलो झाला आहे. तर बांगडा १२० रूपयांनी विकला जात आहे. माशांची आवक घटल्याने मासे महागले आहे, त्यामुळे मासे खाणाऱ्यांमध्ये निराशा आहे.

Published on: Feb 08, 2023 12:10 PM
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
कसबा पोटनिवडणुकीत मनसे नेते कुणाचा प्रचार करणार? पाहा मनसेची भूमिका नेमकी काय?