Mega Block | रेल्वेनं प्रवास करताय? ‘या’ मार्गावर आजपासून ५ दिवस रात्रकालीन ब्लॉक
VIDEO | मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरच्या कामासाठी हार्बर मार्गावर आजपासून ५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेलापूर ते पनवेल या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हार्बर रेल्वे मार्गावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा. हार्बर मार्गावर आजपासून पाच दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरच्या कामासाठी हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेलापूर ते पनवेल या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरूच राहणार आहे. दरम्यान, नव्या मार्गीकेचं काम सुरु असल्याने पनवेल ते बेलापूर या रेल्वे मार्गादरम्यान 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक सुरु झाला असून हा मेगाब्लॉक शनिवारी 11 पासून ते सोमवारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकेचं काम सुरु असल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक शनिवारी 11 पासून ते सोमवारी 1 वाजेपर्यंत सेवा बंद असणार आहे.